घर विकत घेणाऱ्यांचे होत आहे नुकसान! तुम्ही कसे वाचाल ?
स्वतः चे घर हे अनेकांचे स्वप्न असते. वर्षानुवर्षे कष्ट करून, रक्कम जमा करून लोक घर विकत घेतात पण स्वप्नपूर्ती च्या ओघामध्ये अनेक मुद्द्यांकडे दुर्लक्ष होऊन लाखांचे नुकसान हॊत आहे. याचे वारं म्हणजे अति सकारात्मकता आणि कमी व्यावहारिकता. घर घेणे पण शेवटी व्यवहारच आहे, त्यात गोष्टी आपल्या मनाप्रमाणे न होण्याची शक्यता असते याची जाणीव असावी व तसे झाल्यास योग्य तयारी असावी.
बुकिंग अमाऊंट
आपण बिल्डर ला जी बुकिंग अमाऊंट दिली आहे व ती रक्कम देताना ज्या कागदपत्रांवर सह्या केल्या आहेत ते कागदपत्र आपण किती कटाक्षपणे वाचले आहेत. जर आपल्याला करार रद्द करायचा झाला तर आपल्या बुकिंग अमाऊंट पैकी किती टक्के रक्कम कापली जाईल याची कल्पना आहे का आपल्याला? दोन लाख बुकिंग अमाऊंट असेल आणि ५०% कपात असेल तर एक लाख आपण सहज बिल्डर ला देऊन मोकळे हॊत आहात.
मोबदला
बुकिंग झाली, रेजिस्ट्रेशन झाले आणि लोण पण बिल्डर ला मिळाला पण त्यानंतर करार रद्द करण्याची वेळ आली, आता मोबदल्याच्या रकमेपैकी किती रक्कम परत मिळणार आपल्याया? आजकाल बिल्डर रिअल इस्टेट एजन्ट चे पैसे हि कापून घेतात त्याव्यतिरिक्त २०% जरी कपात असेल तर ३० लाखांच्या फ्लॅट चे ६ लाख परत मिळणार नाहीत आणि एजन्ट च्या कमिशन चे ६० हजार अधिक. याची कल्पना होती का आपल्याला?
स्टॅम्प ड्युटी
स्टॅम्प ड्युटी लाखांमध्ये भरावी लागते परंतु जेव्हा काही कारणामुळे व्यवहार रद्द करावा लागतो त्यावेळी स्टॅम्प ड्युटी चे पैसे परत मिळत नाही असे बिल्डर ने सांगितल्याचे ऐकायला येत आहे. जर आपला अथवा आपल्या परिचितांपैकी कोणावर असा प्रसंग आला असल्यास, हे समझुन घ्या कि स्टॅम्प ड्युटी ची रक्कम शासन परत करते. कृपया ते पैसे सोडू नये.
अनेक वेळा बिल्डर स्टॅम्प ड्युटी भरून त्याची पावती ही स्वतःजवळच ठेवून घेत आहेत. स्टॅम्प ड्युटी भरली कि नाही याबाबतीत घर घेणाऱ्यानां काहीच माहिती नसते मग ते पैसे बिल्डर जवळ पडून असतात. स्टॅम्प ड्युटी भरल्याचे बिल्डर ने सांगताच आपण पुरावा म्हणून त्यांच्या कडून स्टॅम्प ड्युटी भरल्याचे चलन घ्यावे.ते चलन तुमच्याच नावी भरले आहे याची खात्री करून घ्यावी कारण जर ते चलन तुमच्या नावाने नसेल आणि स्टॅम्प ड्युटी परत घेण्याची वेळ आली तर तुम्हाला स्टॅम्प ड्युटी परत मिळणार नाही. ज्याचे नाव स्टॅम्प ड्युटी च्या चलनावर आहे त्याच्याच बँक अकाउंट मध्ये स्टॅम्प ड्युटी चे पैसे शासनाकडून दिले जातात. जर बिल्डर ने स्वतःच्या नाव स्टॅम्प ड्युटी भरली असेल तर पाठपुरावा करून बिल्डर ला स्टॅम्प ड्युटी परतावा घेण्यास भाग पाडावे व त्यानंतर लगेच ते पैसे आपल्या अकाउंट मध्ये ट्रान्सफर करण्याचे लेखी निर्देश द्यावेत.
घर घेण्याआधी कागदपत्र नीट दक्ष रहा , स्टॅम्प ड्युटी बद्दल अधिक माहिती करिता येथे क्लिक करा.
स्टॅम्प ड्युटी परतावा घेण्याकरिता estampdutyrefund.com या वेबसाईट ला भेट द्या.