रजिस्ट्रेशन करीता भरलेली स्टॅम्प ड्युटी (मुद्रांक शुल्क) परत मिळते का?

तुम्हाला विश्वास नाही बसणार, हा प्रश्न मला किती जण विचारतात. एवढी लाखांची रक्कम पण त्याबाबतीत लॊकांना असलेली खरं तर नसलेली माहिती थक्क करण्याजोगीच आहे. स्टॅम्प ड्युटी (मुद्रांक शुल्क) संबंधित फार प्रश्न आहेत त्यापैकी काहींची उत्तरं मी येणेप्रमाणे देण्याचा प्रयत्न केला आहे. संबंधित माहिती ही महाराष्ट्र राज्याकरिता असून मार्च २०१९ या काळी लिहिली गेल्याची नोंद असावी.

प्र. रजिस्ट्रेशन (नोंदणीकरण) केले नसल्यास स्टॅम्प ड्युटी (मुद्रांक शुल्क) परत मिळते का?

उ. हो, रजिस्ट्रेशन केले नसल्यास स्टॅम्प ड्युटी (मुद्रांक शुल्क) भरणा केल्याच्या ६ महिन्यांच्या आत स्टॅम्प ड्युटी परतावा अर्ज केल्यास स्टॅम्प ड्युटीची रक्कम परत मिळू शकते .

प्र. मला केलेले रजिस्ट्रेशन रद्द करायचे आहे तसे केल्यास स्टॅम्प ड्युटी (मुद्रांक शुल्क) परत मिळते का? आणि जी एस टी चे काय?

उ. जी एस टी करीता आपण बिल्डर यांच्याशी चर्चा करावी, नकारार्थी उत्तर मिळाल्यास त्वरित रेरा मध्ये तक्रार करावी सध्या अनेक सदिनका खरेदीदारास रेरा मार्फत समाधानकारक निर्णय मिळत आहेत. स्टॅम्प ड्युटी (मुद्रांक शुल्क) परत मिळणे कामी करार रजिस्ट्रेशन झाल्याचा तारखेपासून ५ वर्षांच्या आत तो रद्द करावा (रद्द करण्याची प्रक्रिया म्हणजे रद्द करार बनवून त्याचे रजिस्ट्रेशन करणे). करार रद्द झाल्यानंतर त्या तारखेपासून ६ महिन्यांच्या आत स्टॅम्प ड्युटी परतावा अर्ज केल्यास स्टॅम्प ड्युटीची रक्कम परत मिळू शकते .

प्र. मी स्टॅम्प ड्युटी भरल्याचा पुरावा काय असतो, माझ्याकडे बिल्डर ने दिलेली पावती आहे ती चालेल का?

उ. नाही चालणार. स्टॅम्प ड्युटी भरणा हा ग्रास चलन मार्फत अथवा ई एस बी टी आर (स्टॅम्प पेपर प्रमाणे स्वरूप )या संलेखा मार्फत करावा. स्टॅम्प ड्युटी परताव्याकरिता सदर संलेखांची मुळ प्रत (ओरिजिनल कॉपी) आवश्यक असुन स्टॅम्प ड्युटी परताव्याकरिता जमा केल्यानंतर परत मिळत नाही याची नोंद घ्यावी.

प्र. स्टॅम्प ड्युटी परताव्याकरिता लागणारी कागदपत्रे कोणती?

उ. घ्या लिहुन,

  • करारनामा

  • रद्दलेख

  • परतावा फॉर्म

  • जबाब

  • सत्यप्रतिज्ञालेख

  • एन ओ सी

  • कॅन्सल्ड चेक

  • कुलमुखत्यारपत्र, आधार कार्ड अथवा पॅन कार्ड

प्र. बिल्डर करारनामा व रद्दलेख यांच्या ओरिजिनल कॉपी देण्यास तयार नाही, पुढे प्रॉपर्टी विक्याकरिता लागतील असे महतो आहे, बिना ओरिजिनल कॉपीचे काम होईल का?

उ. नाही. ओरिजिनल कॉपी हवीच, ती परत मिळत नाही, सरकार ते परत देत नाही. आणि तुम्हाला म्हणून सांगतो पुढे प्रॉपर्टी विकण्याकरिताही बिल्डर ला ओरिजिनल पेपर लागत नाही, तशी कायदेशीर आवश्यकता असती तर कोणालाच स्टॅम्प ड्युटी परत मिळाली नसती.

प्र. स्टॅम्प ड्युटी ची रक्कम पूर्ण परत मिळते कि काही अंश स्वा:हा हॊतॊ ? आणि रजिस्ट्रेशन फी चे काय ?

उ. १००० रुपये एवढी कमाल मर्यादा आहे सरकारी कपातीची, बाकी सर्व रक्कम परत आपल्या बँक अकाउंट मधये थेट पाठवली जाते, चेक, रोकड या सारखे प्रकार बंद आहेत. जर रजिस्ट्रेशन झाले नसेल तरच रजिस्ट्रेशन फी परत मिळणार त्यात काहीही कपात होत नाही.

प्र. स्टॅम्प ड्युटी परतावा अर्ज कुठे करावा व त्यास किती कालावधी लागतो ? स्वत: जातीने हज़र असण्याची गरज आहे का?

उ. स्टॅम्प ड्युटी परतावा अर्ज हा आपण जिल्ह्याच्या मुद्रांक जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयामध्ये करावा. चोख पाठपुरावा असल्यास साधारण कालावधी १ ते ३ महिन्याचा असतो, पाठपुरावा नसल्यास श्रींची ईच्छा . स्वत: हज़र होण्यास शक्य नसेल तर इतर व्यक्तीला मुखत्यारपत्र देणे शक्य आहे.

प्र. स्टॅम्प ड्युटी परतावा अर्ज हा नामंजुर होऊ शकतॊ का? तसे झाल्यावर काय करावे?

उ. स्टॅम्प ड्युटी परतावा अर्ज यामध्ये काही तृटी असल्यास तो नामंजुर होऊ शकतॊ. तसे झाल्यास आपण आई जी आर यांच्याकडे अपील करू शकता.

प्र. तुम्ही कोण आहेत आणि एवढी माहिती तुमच्या कडे कशी काय?

उ. मी ई स्टॅम्प ड्युटी रिफंड या वेबसाईटशी (संकेतस्थळ) निगडित असुन रिफंड मिळवुन देण्यास लोकांना सहाय्य करतो.

प्र. वाटलच मला, काही कारण असल्याशिवाय एवढी माहिती सहजा सहजी का म्हणून कॊणी देईल, नाही का, आता तुम्ही म्हणाल कि सर्वांनीच तुमची मदद घ्यायला हवी म्हणजे त्यांची कामे लवकर होतील,बरोबर का ?

उ. नाही आम्ही किमान १,००,०००/- एवढी स्टॅम्प ड्युटीची रक्कम असेल तरच आपणास साहाय्य करू शकतो. काही लोकांना स्वतः च परताव्याची प्रक्रिया पूर्ण करायची असते त्यांना आम्ही योग्य ते मार्गदर्शन करतो, कैकवेळा किरकोळ मानधन घेऊन फाईल तयार करून देतो पुढची औपचारिकता ते स्वतःच पुर्ण करतात. तसेच परतावा वेळेत परत पाहिजे असल्यास त्यामागचे सातत्याने पाठपुराव्याची आवश्यकता असते यामुळे आमचे बहुतांश क्लाइंट्स हे अतिशय व्यस्त एग्झेक्युटिव्ह अथवा व्यवसायिक असतात. पॊलिसांना आणि डिफेन्स परसोनल यांना आम्ही विशेष सवलत देतो.

प्र. बरं, माहिती बद्दल धन्यवाद फोन नंबर वगैरे काही आहे का?

उ. आपण  ९८९०० ००२३० या नंबर वर संपर्क करू शकता किंवा estampdutyrefund.com या वेबसाईट द्वारे फॉर्म भरू शकता. आमच्या वेबसाईट मध्ये परताव्याचा कालावधी कॅल्क्युलेटरही आहे त्याचा वापर करून आपला परतावा सादर करण्याची शेवटची तारीख आपल्याला कळते. धन्यवाद.

Join to newsletter.

Thank you for your message. It has been sent.
There was an error trying to send your message. Please try again later.

Get a personal consultation.

Call us today at +91 9890000230

Request a Quote